11th Admission Allotment List for Round 2 | ११ वी प्रवेश प्रकिया फेरी-२ साठी अलॉटमेंट यादी

राज्यातील अकरावी प्रवेशासाठीची (11th Admission) दुसरी अलॉटमेंट यादी (Allotment List) गुरुवार, १७/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली. ह्या यादी नुसार एकूण २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना महाविद्यालये वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२ विद्यार्थ्यांना आणि कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत.

विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. पात्र विद्यार्थी शुक्रवार, १८/०७/२०२५ ते सोमवार, २१/०७/२०२५ दरम्यान थेट महाविद्यालयात भेट देऊन त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतील. प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरी (Round) मध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल. तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची माहिती बुधवार, २३/०७/२०२५ प्रसिद्ध केली जाईल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाइन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) राबविण्यात येत आहे. यामध्ये एकूण ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत ज्यात एकूण १९ हजार ३२४ शाखा प्रकार व अनुदान प्रकारनिहाय तुकड्यांची संख्या आहे. राज्यात अकरावीसाठी एकूण २१ लाख ३२ हजार ९६० प्रवेश क्षमता आहे. त्याचा विचार करता दुसऱ्या फेरीपर्यंत केवळ एक तृतीयांश प्रवेश होताना दिसत आहेत. परिणामी लाखो विद्यार्थी पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.

अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in/ पोर्टल पाहू शकता.

अलॉटमेंट यादी (11th Admission Allotment List) पाहण्यासाठी:

विद्यार्थी महाराष्ट्र एफवायजेसी (Maharashtra FYJC (First Year Junior College) or Class 11 admissions) अलॉटमेंट यादी https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.

अलॉटमेंट यादी (Allotment List) पाहण्यासाठी चे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

  • https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Allotment List ह्या टॅबवर क्लिक करा
image 18
  • नियमित फेरी-२ (Regular Round – 2) सिलेक्ट करा
  • अर्ज क्रमांक (Application number) भरा
  • ‘Search’ बटन वर क्लिक करा

रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Registration process for Engineering CAP 2025| अभियांत्रिकी कॅप साठी नोंदणी प्रक्रिया

इंजिनीरिंगच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Leave a Comment