शैक्षणिक वर्ष २०२५-२६ राज्यातील अकरावी प्रवेशासाठी (maha fyjc admission / 11th Admission) शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाइन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये एकूण ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत ज्यात अकरावीसाठी एकूण २१ लाख ५० हजार १३० प्रवेश क्षमता आहे. अधिक माहितीसाठी maha fyjc admission in पोर्टल पाहू शकता.
चौथ्या फेरी अखेरपर्यंत १४ लाख ३८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी चौथ्या फेरी अखेरपर्यंत एकूण ८ लाख ८२ हजार ८१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता आणि १२ लाख ६८ हजार ३९८ जागा उपलब्ध होत्या.
३ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य तर्फे अकरावी प्रवेशासाठी ‘ओपन टू ऑल’ फेरी घोषित केली होती. ‘ओपन टू ऑल’ फेरीत गुरुवार (दि. ०७/०८/२०२५) अखेर २ लाख ६३ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे. याच काळात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हा सण आल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी सोमवार (दि. ११/०८/२०२५) पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी माहिती दिली.
अकरावी प्रवेशाची आकडेवारी (11th / maha fyjc admission statistics):

वरील चार्ट महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) प्रवेश प्रक्रियेतील, प्रवेश क्षमता, प्रत्यक्ष प्रवेश आणि रिक्त जागा या तीन घटकांची माहिती दर्शवितो. ही आकडेवारी तीन विभागांमध्ये दिली आहे: कॅप (Centralised Admission Process), कोटा आणि एकूण.
- प्रवेश क्षमता (Admission Intake) :
- कॅप: १८,०७,४४६
- कोटा: ३,४२,६८४
- एकूण: २१,५०,१३०
- प्रवेश (Admission):
- कॅप: १०,३६,३४९
- कोटा: १,६०,४५९
- एकूण: ११,९६,८०८
- रिक्त जागा (Vacancy):
- कॅप: ७,७१,०९७
- कोटा: १,८२,२२५
- एकूण: ९,५३,३२२
या आकडेवारीवरून असे दिसून येते की एकूण २१ लाख ५० हजार १३० जागांपैकी १०/०८/२०२५ पर्यंत फक्त ११ लाख ९६ हजार ८०८ जागा भरल्या गेल्या असून, अजूनही ९ लाख ५३ हजार ३२२ जागा रिक्त आहेत. कॅपअंतर्गत सर्वाधिक प्रवेश झाले आहेत, तर कोटा अंतर्गत प्रवेश तुलनेने कमी आहेत. हे अंतर विद्यार्थ्यांची पसंती, उपलब्ध अभ्यासक्रम, किंवा लोकसंख्येतील बदल यांसारख्या घटकांमुळे निर्माण झालेले असू शकते.
अधिक माहितीसाठी maha fyjc admission in पोर्टल पाहू शकता.
कॅप राउंड-२ साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या Option Form filling for CAP Round 2 of Engineering Admission 2025
संस्थास्तरीय पर्याय फॉर्म भरण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या Institute Level Option Form filling for 2025 Admission | प्रवेशासाठी संस्थास्तरीय पर्याय फॉर्म भरणे