Student Help Center for Admission 2025 | विद्यार्थी सहाय्यता केंद्र

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET-Cell) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘विद्यार्थी मदत केंद्र’ (Student Help Center) स्थापन केले आहेत. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान माहिती, मार्गदर्शन आणि समर्थन देऊन तसेच मार्गात येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करून पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देणे हे या मदत केंद्रांचे उद्दिष्ट आहे.

जिल्हानिहाय “विद्यार्थी सहाय्यता केंद्र” स्थापनेसंबंधी ची जाहीर सूचना सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईट https://cetcell.mahacet.org/ वर उपलब्ध आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम

  • अभियांत्रिकी (Engineering)
  • व्यवस्थापन (management)
  • औषधशास्त्र (pharmacy)
  • स्थापत्य (architecture)

विद्यार्थी मदत केंद्र (student help center) यादी

सहाय्यता केंद्रांची यादी खाली दिलेली आहे:

अ.क्रजिल्हाविद्यार्थी सहाय्यता केंद्र
जळगावशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
नाशिकक्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग, एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक
नंदुरबारश्री गोवर्धनसिहांजी शैक्षणिक सेवा समितीचे पीजी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी, नंदुरबार
अहिल्यानगरविश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, सरोलबद्दी अहिल्यानगर
धुळेश्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै.बापूसाहेब शिवाजी राव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, धुळे
पुणेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे
साताराशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड
सांगलीवालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली
सोलापूरवालचंद इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, सोलापूर
१०कोल्हापूरशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर
११नागपूरशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
१२वर्धाबजाज इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, वर्धा
१३चंद्रपूरशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर
१४भंडारामनोहरभाई पटेल इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी, भंडारा
१५गोंदियाशासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया
१६गडचिरोलीशासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली
१७अकोलाअभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला
१८अमरावतीशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
१९वाशिमसन्मती इंजिनीरिंग कॉलेज, वाशिम
२०बुलढाणाश्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेंगाव
२१यवतमाळशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ
२२मुंबई शहरव्ही. जे. टी. आय. माटुंगा, मुंबई
२३मुंबई उपनगरसरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, अंधेरी
२४ठाणेव्ही.पी.एम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, ठाणे
२५पालघरसेज जॉन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पालघर
२६रायगडडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
२७रत्नागिरीलोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी
२८सिंधुदुर्गएस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, कणकवली
२९बीडनागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालय, परळी, बीड
३०छत्रपती संभाजीनगरशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,  छत्रपती संभाजीनगर
३१धाराशिवतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
३२जालनाइन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा कॅम्पस परिसराबाहेर, जालना
३३लातूरएम एस बिडवे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, लातूर
३४नांदेडश्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी, नांदेड
३५परभणीज्ञानोपासक शिक्षण मंडळाची माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था, परभणी
३६हिंगोलीशासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली

इंजिनीरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

अंतिम गुणवत्ता यादीच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering Admission Final Merit List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया साठी अंतिम गुणवत्ता यादी

अभियांत्रिकी शाखेची निवड कशी करावी याच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा How to Choose Engineering Branch in 2025 | अभियांत्रिकी शाखेची निवड कशी करावी

Leave a Comment

Index