आज (०५/०७/२०२६) रोजी सीईटी (CET) सेलने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना (Technical Education) प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना (Important instructions) जारी केल्या आहेत. त्यासंबंधीची अधिकृत सूचना https://cetcell.mahacet.org/ येथे उपलब्ध आहे.
जारी केलेल्या महत्त्वाच्या सूचना (Important instructions) खालील प्रमाणे आहेत:
बी.ई. / बी.टेक (BE / B.Tech) अभ्यासक्रम :
अखिल भारतीय उमेदवारी (All India Candidature) असलेल्या उमेदवारांसाठी ‘जेईई मेन २०२६’ (JEE Main 2026) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील. मात्र, राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) निर्देशानुसार, जे उमेदवार जेईई मेन २०२६ च्या गुणांद्वारे अर्ज करु इच्छितात, त्यांच्या डिजीलॉकर (DigiLocker) खात्यामध्ये गुणपत्रिका (Score Card) असणे बांधनकारक आहे. तुमचे गुण यशस्वीरीत्या जोडण्यासाठी खालील दोन टप्प्याांचे पालन करा:
- टप्पा १ (Step 1): सर्वप्रथम तुमच्या वैयक्तीक डिजीलॉकर (DigiLocker) खात्यामध्ये जाऊन तुमची ‘जेईई मेन २०२६’ ची गुणपत्रिका मिळवा (Fetch करा).

- टप्पा २ (Step 2): यानांतर, कॅप (CAP) पोर्टलवर लॉगिन करून तुमचे ‘जेईई मेन’चे गुण डिजीलॉकरद्वारे कॅप पोर्टलमध्ये समाविष्ट (Fetch) करा.

बीबीए / बीसीए / बीएमएस / बीबीएम (BBA / BCA / BMS / BBM) अभ्यासक्रम :
सदर अभ्यासक्रमांसाठी पात्रतेचा विस्तार करण्यात आलेला असून या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एमएचटी सीईटी २०२६ (MHT CET 2026 – PCM किंवा PCB ग्रुप) ही परीक्षा देखील पात्र करण्यात आली आहे. एमएचटी सीईटी २०२६ परीक्षेला बसलेले उमेदवार या व्यावसायिक कोर्सेसच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
विशेष प्रवर्ग आरक्षण (Special Reservations)
- संरक्षण दल आरक्षण (Defence Reservation): महाराष्ट्र शासनाचे नियम आणि भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय (माजी सैनिक कल्याण विभाग) याांच्या दि. २१ मे २०१८ रोजीच्या पत्र क्र. F.No.6(1)/201/D (Res.II) नुसार संरक्षण दल आरक्षण लागू राहील.
- अनाथ आरक्षण (Orphan Reservation): महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR) अनाथ आरक्षण लागू राहील.
इतर कोटा प्रवेश (NRI, OCI, PIO, CIWGC, FN)
प्रवेश पोर्टल: जे उमेदवार NRI, OCI, PIO, CIWGC किंवा परदेशी नागरिक (FN) कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करत आहेत, त्यांनी fn.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ओसीआय (OCI) उमेदवारांच्या बाबतीत, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या WP(C) No. 891/2021 मधील आदेशातील निर्देश लागू राहतील.
नियम, छाननी केंद्र आणि मदत कक्ष (Support)
- छाननी केंद्र व पात्रता: भौतिक छाननी केंद्रांची (Physical Scrutiny Centers) यादी, पात्रता निकष आणि प्रवेशाचे नियम (instructions) व अटी प्रत्येक अभ्यासक्रमाच्या स्वातंत्र कॅप (CAP) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- मदत आणि चौकशी : फॉर्म भरताना काही अडचण किंवा प्रश्न असल्यास उमेदवार पुढील पर्यायांचा वापर करू शकतात:
- विद्यार्थांनी राज्यातील २६ जिल्ह्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरु करण्यात आलेल्या विध्यार्थी सहाय्यता केंद्रांना भेट द्यावी. अशा विध्यार्थी सहाय्यता केंद्रांची यादी सीईटी कक्षाच्या संकेत स्थळावर (https://cetcell.mahacet.org/) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप विध्यार्थी सहाय्यता केंद्रे स्थापन करण्यात आलेली नाहीत, त्या जिल्ह्यांमध्ये केंद्रे कार्यान्वित झाल्यानांतर त्याबाबतची माहिती सीईटी कक्षाच्या संकेत स्थळावर स्वातंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
- संबंधित अभ्यासक्रमाच्या कॅप पोर्टलवर हेल्पलाईन नांबर (Helpline Numbers) उपलब्ध आहेत.
- कॅप पोर्टलवर उमेदवाराच्या लॉगीन मध्ये मेसेजिंग सिस्टीम / तिकीट प्रणाली (Messaging / Ticketing System) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अभ्यासक्रम व कॅप पोर्टल:
खाली दिलेला तक्ता अभ्यासक्रम व कॅपची अधिकृत वेबसाइट दर्शयवतो.
| अ.क्र. | अभ्यासक्रम | कॅपची अधिकृत वेबसाइट |
| १. | B.E./B.Tech. | http://fe2026.mahacet.org/ |
| २. | DSE | https://dse2026.mahacet.org.in/ |
| ३. | M.E./M.Tech. | http://me2026.mahacet.org/ |
| ४. | MBA/MMS | https://mba2026.mahacet.org.in/ |
| ५. | MCA | https://mca2026.mahacet.org.in/ |
| ६. | BBA/BMS/BBM | https://bba2026.mahacet.org.in/ |
| ७. | BCA | https://bca2026.mahacet.org.in/ |
निष्कर्ष
प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया ही तुमच्या पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्याच्या दिशेने टाकलेली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. पात्रतेचे निकष समजून घेऊन, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून, नोंदणी प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करून आणि सर्व मुदतींचे (deadlines) पालन करून तुम्ही अनावश्यक विलंब व चुका टाळू शकता.
अद्ययावत माहिती ठेवणे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे तुमचा प्रवास अधिक सुलभ करेल. तुमची नोंदणी लवकरात लवकर सुरू करा, अर्ज सादर करण्यापूर्वी प्रत्येक तपशील तपासा आणि समुपदेशन (counselling) वेळापत्रक व प्रवेशाबाबतच्या सूचनांसाठी नियमितपणे अद्यतने (updates) पहा.
सुव्यवस्थित नोंदणी प्रक्रियेमुळे केवळ वेळेची बचतच होत नाही, तर प्रवेशाचा अनुभव विनासायास आणि सुरळीत होण्याची शक्यताही वाढते. आजच पहिले पाऊल टाका आणि तुमच्या करिअरची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जा.
Engineering admission process 2026 |अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया Engineering admission process
Registration process for Engineering CAP Round 2026 | अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया Registration process for Engineering CAP Round