शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया (Registration process for engineering CAP) २८/०६/२०२५ पासून सुरू झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना जागा देण्यासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) द्वारे वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे.
कॅप हे सुनिश्चित करते की प्रवेश गुणवत्ता, पसंती आणि आरक्षण नियमांवर आधारित आहेत, ज्यामुळे फेरफार आणि पक्षपात होण्याची शक्यता कमी होते. नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होते. नोंदणी प्रक्रियेदरम्यान, MHT-CET गुणांच्या (Score) आधारे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही अर्ज शुल्क (application fee) भरावे लागणार नाही. तर, JEE (Main) गुणांच्या आधारे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज शुल्क (सामान्य प्रवर्गासाठी (General Category / OMS / J & K): ₹ 1000/-, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (Reserved Category of Maharashtra State Only): ₹ 800/-) भरावे लागेल.
विद्यार्थ्यांना कॅप मध्ये भाग घेण्यासाठी https://fe2025.mahacet.org ह्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
खाते तयार करा (Create an account):
खाते तयार करताना विद्यार्थ्यांना दोन पर्याय आहेत: १. साइन इन (Sign In): जर विद्यार्थी MHT-CET गुणांच्या आधारे अर्ज करणार असेल तर; २. नोंदणी करा (register): जर विद्यार्थी JEE (Main) गुणांच्या आधारे अर्ज करणार असेल तर.

नोंदणी दरम्यान, विद्यार्थ्याने एसएससी मार्कशीट (SSC Marksheet) नुसार पूर्ण नाव भरावे, ईमेल आयडी भरावा आणि पासवर्ड तयार करावा नंतर जन्मतारीख टाकावी.

साइन इन करा (Sign In):
अर्ज भरण्यासाठी “Centralised Admission Process (CAP) Registration” या बटणावर वर क्लिक करा.

नंतर “Bachelor of Engineering” या बटन वर क्लिक करा.

पात्रता परीक्षा निवडा (Select your Eligibility Exam):
खालील पैकी विद्यार्थ्याने त्याची पात्रता परीक्षा निवडावी
- PCM MHT-CET 2025
- PCB MHT-CET 2025
- JEE (Main) 2025
- NEET 2025
- NEUT / JKSSS / PMSSS Candidate
- Diploma in Engineering & Technology
- D.Voc.
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने सूचीबद्ध केलेल्या प्रवेश परीक्षेपैकी किमान एक परीक्षा दिली असावी.

सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, Save and Proceed या बटणावर क्लिक करा.
नोंदणी तपशील (Registration Details for CAP 2025):
वैयक्तिक माहिती (Personal Details):
ऑनलाइन नोंदणी फॉर्म उघडल्यानंतर, विद्यार्थ्याने त्यांचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, धर्म, मूळ देश, मातृभाषा, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, आधार क्रमांक (पर्यायी) आणि राष्ट्रीयत्व इत्यादी तपशील भरावे लागतील. सर्व तपशील योग्यरित्या भरणे अनिवार्य आहे.

संपर्काची माहिती (Communication Details):
कृपया तुमची संपर्क माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा.

मोबाईल नंबर पडताळण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्याला “Application ID” दाखवला जाईल.

अर्ज पूर्ण भरण्यासाठी “Proceed to complete the Application Form” या बटणावर क्लिक करा.
पडताळणी पद्धत (Select Scrutiny Mode):
येथे विद्यार्थ्याने अर्जाच्या पडताळणीची पद्धत निवडणे आवश्यक आहे. पडताळणी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने होते. विद्यार्थ्याने सुविधा केंद्रावर (Scrutiny Centre) किंवा यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी करावी. अर्जात केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे विद्यार्थ्याला बंधनकारक आहे.

उमेदवारी प्रकार निवडा (Select Your Candidature Type):
विद्यार्थ्यांनी संबंधित प्रकारावर दिलेल्या सर्व सूचना वाचल्यानंतरच उमेदवारी प्रकाराची निवड करावी. उमेदवारी प्रकाराबद्दल माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश वेबसाइटला (https://fe2025.mahacet.org) भेट द्यावी. अर्जाची माहिती भरणे सुरू ठेवण्यासाठी “Save and Proceed” बटणावर क्लिक करा.
मूळ विद्यापीठ आणि प्रवर्ग तपशील (Home University & Category Details):
यामध्ये, उमेदवारांची मूळ विद्यापीठ आणि उमेदवारीच्या प्रकारानुसार माहिती विचारण्यात येईल. उमेदवारांनी ती माहिती योग्यरित्या भरावी. सूचनांनुसार सर्व माहिती योग्यरित्या भरावी. अचूक माहिती भरुन “Save and Proceed” बटणावर क्लिक करा.
विशेष आरक्षण तपशील (Special Reservation Details):
विशेष आरक्षणा अंतर्गत विद्यार्थी PWD, Défense and TFWS बाबतची माहिती विचारात घेण्यात येईल, जर उमेदवाराला या आरक्षणांपैकी एकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने संबंधित माहिती भरावी किंवा Not Applicable निवडावे. सर्व माहिती भरुन “Save and Proceed” बटणावर क्लिक करा.
पात्रता तपशील (Qualification Details):
दहावी / समतुल्य परीक्षा तपशील (SSC / Equivalent Details):
विद्यार्थ्याने दहावी बोर्ड, परीक्षेचे वर्ष निवडावे आणि आसन क्रमांक नमूद करावा. त्यानंतर मिळालेले गुण, एकूण गुण नमूद करावे.

बारावी / समतुल्य परीक्षा तपशील (HSC / Equivalent Details):
बारावीची माहिती भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा, बारावी बोर्ड आणि बारावी बोर्ड स्थान निवडा. २०२५ मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना गुण भरण्याची आवश्यकता नाही कारण ते खाली दिलेली माहिती भरून थेट गुण मिळवू शकतात. बारावीच्या परीक्षेचे वर्ष निवडा, बारावीचा आसन क्रमांक प्रविष्ट करा, आईचे नाव आणि उमेदवाराचे नाव प्रविष्ट करा, नंतर “बारावीची माहिती मिळवा” बटणावर क्लिक करा.

माहिती भरुन “Save and Proceed” बटणावर क्लिक करा.
छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
कागदपत्रे अपलोड (Document Upload):
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
- अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate ) (लागू असेल तर)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (लागू असेल तर)
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer (NCL) Certificate) (लागू असेल तर)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate) (लागू असेल तर)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) (लागू असेल तर)
- १० वी ची मार्कशीट (SSC Marksheet)
- १२वी ची मार्कशीट (HSC Marksheet)
- MHT-CET किंवा JEE (Main)स्कोअरकार्ड
इंजिनीरिंगच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया