Engineering Admission CAP Registration Status for 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप नोंदणी स्थिती

यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (Engineering Admission) प्रवेशासाठी विक्रमी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) केली आहे. यावरून असे दिसून येते की अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे, यावरुन असे स्पष्ट होते कि यावर्षी प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असेल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप (CAP) फेरीसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) नोंदणी प्रक्रिया (registration process) २८ जूनपासून सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवार, दिनांक १४/०७/२०२५ रोजी संपुष्टात आली. यामध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी अशी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातून यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे असून, कॉलेजांतील प्रवेशाच्या जागा भरल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर प्रवेशासाठी १ लाख ८० हजार १७० जागा उपलब्ध होत्या. या जागांवर १ लाख ४९ हजार ७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

image 17

दरम्यान, गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीच्या रिक्त जागांची संख्या वाढली होती. परिणामी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांअभावी अनेक महाविद्यालयांमध्ये काही अभ्यासक्रम चालवणे कठीण झाले होते. यावर्षी विद्यार्थी नोंदणी वाढल्याने प्रवेशांमध्ये वाढ होण्याची आशा महाविद्यालयांना आहे. त्यापैकी, सर्वाधिक पसंतीच्या संगणक आणि संबंधित शाखांकडे या वर्षीही विद्यार्थ्यांचा ओढा अधिक राहणार असून अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

कॅपसाठी वाढलेल्या नोंदणीवरून हेही स्पष्ट होते कि ह्या वर्षी अभियांत्रिकीच्या पारंपरिक शाखा जसे कि यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering), स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) यांना हि चांगले प्रवेश होतील.

पुढील वेळापत्रक

अनुक्रमांकउपक्रमपहिली तारीखशेवटची तारीख
१.तात्पुरती गुणवत्ता यादी१९/०७/२०२५
२.तात्पुरत्या गुणवत्ता यादीबाबत तक्रारी सादर करणे२०/०७/२०२५२२/०७/२०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
३.अंतिम गुणवत्ता यादी२४/०७/२०२५

सुधारित वेळापत्रक http://fe2025.mahacet.org या वेबसाइटवर पाहू शकता.

रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Registration process for Engineering CAP 2025| अभियांत्रिकी कॅप साठी नोंदणी प्रक्रिया

इंजिनीरिंगच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Leave a Comment