महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-२ (CAP Round-2) साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आज (११/०८/२०२५) रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. द्वितीय फेरीसाठी पर्याय फॉर्म भरण्याची तारीख ०६ ऑगस्ट २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती. विद्यार्थी कॅप फेरी-२ (CAP Round-2) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता.
सीईटी सेलकडून एमएचटी-सीईटी (MHT-CET) व जेईई (JEE) परीक्षांच्या गुणांच्या आधारावर प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा प्रवेशासाठी साधारण १ लाख ७७ हजार २६५ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश घेण्यासाठी २ लाख १७ हजार३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी कॅप फेरी-१ साठी पर्याय फॉर्म भरले. त्यानंतर १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी कॉलेज अलॉट झाले. त्यापैकी केवळ ३२,६३५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले असून, हे प्रमाण २२.५४ टक्के आहे.
हा ब्लॉग तुम्हाला तुमची वाटप स्थिती कशी तपासायची आणि प्रवेश प्रक्रियेतील पुढील पायऱ्या काय आहेत याबद्दल मार्गदर्शन करेल.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना (Important Instruction):-
- कॅप फेरी-२ (CAP Round-2) मध्ये कोणताही बदल न झालेल्या उमेदवारांसाठी सूचना:
- तुम्हाला कॅप फेरी-२ (CAP round-2) मध्ये सुधारणा / बेटरमेंट (Not Freeze / Betterment) मिळाले नाही. कॅप फेरी-१ (CAP round-1) मधील तुमचे जागा वाटप (Seat Allotment) कायम ठेवले आहे.
- जर उमेदवाराला बेटरमेंट मिळाले असेल किंवा कॅप फेरी-२ (CAP round-2) मध्ये कोणताही बदल झाला नसेल आणि उमेदवाराला मिळालेल्या जागेवर प्रवेश (Admission) घ्याचा असेल तर, सीट अॅक्सेप्टन्स लिंकवर (Seat Acceptance for CAP-II Link) क्लिक करून त्यांची पुष्टी देऊन सीट अॅक्सेप्टन्स फ्रीज (FREEZE) करणे आवश्यक आहे.
- जर उमेदवाराने सीट अॅक्सेप्टन्स स्टेटस (Seat Acceptance Status) बाबत कोणतीही कारवाई केली नाही, तर उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र असेल.
- जागा वाटप झालेल्या संस्थेत प्रवेशासाठी अहवाल (report) देण्याच्या तारखा १२/०८/२०२५ ते १४/०८/२०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
- दुसऱ्या फेरीत सहभागी झालेल्या आणि पहिल्यांदाच जागा वाटप झालेल्या उमेदवारांसाठी:
- सर्व पात्र उमेदवारांनी जागा वाटपाची स्वतः पडताळणी करावी.
- उमेदवाराने त्याच्या लॉगिनद्वारे घोषणा स्वीकारावी आणि अर्जात उमेदवाराने नमुद केलेले पात्रता गुण, श्रेणी, लिंग, आरक्षण, विशिष्ट आरक्षण इत्यादींशी संबंधित त्याचा/तिचा दावा बरोबर असल्याचे आणि त्याचे/तिचे दावे सिद्ध करण्यासाठी अपलोड केलेले संबंधित कागदपत्रे खरे आणि बरोबर असल्याचे प्रमाणित करावे.
- दुसऱ्या फेरीत पहिल्यांदाच जागा वाटप झालेल्या उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने त्याच्या लॉगिनद्वारे जागा स्वीकृती शुल्क भरावे.
- जर विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत त्यांच्या पहिल्या तीन पसंतीनुसार जागा वाटप (Seat allotment) करण्यात आली असेल तर
- ती जागा “auto freeze” (स्वयंचलितपणे गोठवलेल्या), तर त्यांनी त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे (Seat Acceptance Fees) लागेल (जर पहिल्या फेरीत भरले नसेल तर)
- असे विद्यार्थी पुढील फेरीत सहभागी होण्यास पात्र राहणार नाहीत.
- जागा स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी नियुक्त केलेल्या संस्थेत रिपोर्ट करावे.
- ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतींव्यतिरिक्त इतर पसंतींचे वाटप झाले असेल तर :-
- जागावाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅपफेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: च्या लॉग-इन मधून करावी.
- ज्या राखीव प्रवर्गातील (Reserved Category) विद्यार्थ्यांनी नोंदणी, ई-पडताळणी किंवा भौतिक कागदपत्र पडताळणी आणि पुष्टीकरण कालावधी दरम्यान जात/जमाती वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र पावती सादर केली होती, त्यांनी मूळ जात/जमाती वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र भौतिक तपासणी केंद्र किंवा ई-पडताळणी केंद्रावर अपलोड आणि पडताळणी करावी आणि चौथ्या फेरीच्या अहवालाच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी प्रवेशित संस्थेत मूळ प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा या उमेदवारांचा प्रवेश आपोआप रद्द होईल आणि खुल्या प्रवर्गासाठी उमेदवार पूर्ण भरलेल्या पात्रता निकषांनुसार पुढील संस्थास्तरीय फेरीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणला जाईल.
- ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमांकाखेरीज इतर पसंतीक्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवारास वाटप झालेली जागा कायम ठेऊन पुढील फेरींमध्ये वरच्या पसंतीक्रमावरील जागा मिळविण्याकरिता सहभागी होण्यास पात्र असतील.या करिता उमेदवाराने वाटप झालेली जागा स्वीकारण्याच्या (seat acceptance) उद्देशाने जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले पाहिजे अन्यथा त्यांना वाटप झालेली जागा (seat allotment) कायम ठेवता येणार नाही.
- जागावाटपाच्या स्वयं पडताळणी दरम्यान जर उमेदवारांला, उमेदवारी अर्जाच्या नमुन्यात केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागावाटप व त्याने केलेला दावा योग्य नाही असे आढळून आले आणि त्याला त्याची चूक दुरुस्त करायची असल्यास (या नियमांच्या पोट-नियम (४) च्या खंड (ङ) नुसार, चुका दुरुस्त करण्याचे प्रयोजन), उमेदवाराने ई-स्क्रूटनी पध्दत यांद्वारे तक्रार/हरकत नोंदवावी.
- नंतरच्या टप्प्यात, उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यांवरून उमेदवाराला जागावाटप (seat allotment) झालेले आहे असे आढळल्यास, असे जागावाटप/जागावाटप केलेल्या संस्थेत घेतलेला प्रवेश आपोआप रद्द होईल.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन पद्धतीने रु. १०००/- (फक्त एक हजार रुपये) जागा स्वीकृती (seat acceptance) शुल्क भरावे लागेल. जागा स्वीकृती शुल्क (seat acceptance fees) हे नॉन-रिफंडेबल असेल.
- १२/०८/२०२५ ते १४/०८/२०२५ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत / पूर्वी कॅप फेरी २ (CAP round-2) च्या वाटपानुसार उमेदवाराने त्याच्या/तिच्या लॉगिनद्वारे ऑफर केलेल्या जागेवर स्वीकृती (seat acceptance) देणे.
- १२/०८/२०२५ ते १४/०८/२०२५ संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत / पूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि कॅप फेरी २ (CAP round-2) नंतर शुल्क भरून वाटप केलेल्या संस्थेला अहवाल देणे आणि प्रवेशाची पुष्टी करणे.जागावाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅपफेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: च्या लॉग-इन मधून करावी.
कॅप फेरी-२ ची अलॉटमेंट यादी (CAP Round-2 Allotment List) पाहण्यासाठी:
विद्यार्थी कॅप फेरी-२ (CAP Round-2) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता.
कॅप फेरी-२ ची अलॉटमेंट यादी (CAP Round-2 Allotment List) पाहण्यासाठी चे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
- https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Check Provisional Allotment Status CAP Round-2” ह्या टॅबवर क्लिक करा

- स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल
- तुमची तात्पुरती जागा वाटप स्थिती पाहण्यासाठी तुमचा अर्ज आयडी (Application ID) आणि जन्मतारीख (Date of Birth) प्रविष्ट करा.
- ‘SUBMIT’ बटन वर क्लिक करा
- स्क्रीनवर तात्पुरती जागा वाटप स्थिती प्रदर्शित होईल
- तात्पुरती जागा वाटप स्थिती पीडीएफ डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ती जतन करा.
निष्कर्ष
अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-२ ची जागा वाटप यादी २०२५ ची घोषणा ही महाराष्ट्रातील हजारो इच्छुकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमची जागा वाटपाची स्थिती काळजीपूर्वक तपासणे, दिलेल्या मुदतीत जागा स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करणे आणि पडताळणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ही तुमच्या अभियांत्रिकी प्रवासाची फक्त सुरुवात आहे – स्पष्टता आणि आत्मविश्वासाने संपर्क साधा. कोणत्याही शंका किंवा पुढील मार्गदर्शनासाठी, अधिकृत अद्यतने आणि विश्वसनीय प्रवेश संसाधनांशी संपर्कात रहा. यशस्वी प्रवेशासाठी आणि पुढील उज्ज्वल अभियांत्रिकी कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!हा ब्लॉग उपयुक्त वाटला असेल, तर इतर मित्रांना नक्की शेअर करा. तुमचे प्रश्न खाली कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका.
तुमच्या अभियांत्रिकी प्रवासासाठी खूप शुभेच्छा!
११ वी प्रवेश प्रकियाओपन टूऑलफेरीच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Maha fyjc admission 2025 open to all Round | ११ वी प्रवेश प्रकियाओपन टूऑलफेरी
संस्थास्तरीय पर्याय फॉर्म भरण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या Institute Level Option Form filling for 2025 Admission | प्रवेशासाठी संस्थास्तरीय पर्याय फॉर्म भरणे