Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात अभियांत्रिकी शिक्षणाला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी आघाडीचे केंद्र मानले जाते. साधारणपणे, सर्व खाजगी (Private) किंवा सरकारी (Government) महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (Engineering admission process) ही प्रवेश परीक्षा आणि समुपदेशनावर अवलंबून असते. मुख्यतः प्रवेश हा MHT CET (महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) किंवा JEE (Main)  गुणांवर (Score) आधारित असतो. पात्रता निकष पूर्ण करणारे आणि दोन्ही परीक्षांमध्ये वैध गुण असलेले उमेदवार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) आयोजित केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (CAP) समुपदेशनात (counselling) सहभागी होऊ शकतात. तर, तुम्हाला या लेखातून अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळेल.

१. पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता:

  • विद्यार्थ्याने १२वी (HSC) परीक्षा भौतिकशास्त्र (Physics), गणित (Mathematics) अनिवार्य (compulsory) विषय सोबत रसायनशास्त्र (Chemistry) किंवा बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology) किंवा जीवशास्त्र (Biology) किंवा तांत्रिक व्यावसायिक विषय (Technical Vocational subject) किंवा संगणक विज्ञान (Computer Science) किंवा माहिती तंत्रज्ञान (Information Technology) किंवा माहितीशास्त्र पद्धती (Informatics Practices) किंवा शेती (Agriculture) किंवा अभियांत्रिकी ग्राफिक्स (Engineering Graphics) किंवा व्यवसाय अभ्यास (Business Studies) किंवा इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) किंवा उद्योजकता (Entrepreneurship) या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • सामान्य प्रवर्गासाठी किमान ४५% गुण, तर मागासवर्गीय (Reserved categories) विद्यार्थ्यांसाठी (SC, ST, OBC, VJNT, SEBC, EWS, Persons with Disability candidates belonging to the Maharashtra State only इत्यादी) ४०% गुण आवश्यक असतात.

इतर निकष:

  • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे, तरच त्याला महाराष्ट्र राज्याच्या ८५% जागांवर आरक्षणाचा लाभ मिळतो.
  • इतर राज्यातील विद्यार्थीही प्रवेशासाठी अर्ज करू शकतात, पण त्यांच्यासाठी ऑल इंडिया कोटा (15%) लागू होतो.

२. प्रवेश परीक्षा (Entrance Exams)

  • MHT CET (Maharashtra Health and Technical Common Entrance Test): ही परीक्षा महाराष्ट्र शासनाद्वारे घेतली जाणारी एक संगणक आधारित (CBT) प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात घेतली जाते आणि त्याचा निकाल साधारणतः जून मध्ये जाहीर होतो.
  • JEE (Main) (Joint Entrance Examination (Main)): संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (National Testing Agency (NTA)) द्वारे घेतली जाणारी एक संगणक आधारित (CBT) प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतली जाते आणि त्याचा निकाल साधारणतः फेब्रुवारी मध्ये जाहीर होतो.

३. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process)

MHT-CET किंवा JEE (Main) मधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Engineering admission process) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये (कॅप) मध्ये भाग घ्यावा लागतो. कॅप (CAP) ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असते.  कॅप मध्ये भाग घेण्यासाठी MHT CET मध्ये पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही समुपदेशन शुल्क भरावे लागत नाही. तर JEE (Main) च्या गुणांच्या आधारे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन शुल्क (सामान्य प्रवर्गासाठी : ₹ 1000/-, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी : ₹ 800/- ) भरावे लागेल .

CAP Round प्रक्रिया:

student 849825 1280

नोंदणी (Registration):

विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये (CAP) मध्ये भाग घेण्यासाठी https://fe2025.mahacet.org/StaticPages/HomePage  ह्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी लागते.

कागदपत्रे अपलोड (Document Upload):

  • MHT-CET किंवा JEE (Main)स्कोअरकार्ड
  • १२वी ची मार्कशीट (HSC Marksheet)
  • १० वी ची मार्कशीट (SSC Marksheet)
  • जन्मतारीख पुरावा (Birth Certificate)
  • अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC / LC)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate ) (लागू असेल तर)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (लागू असेल तर)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer  (NCL) Certificate) (लागू असेल तर)

कागदपत्रे पडताळणी (Document Verification):

कागदपत्रे पडताळणी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने होते. विद्यार्थ्याने सुविधा केंद्रावर (Scrutiny Centre) किंवा यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी करावी. अर्जात केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे उमेदवाराने बंधनकारक आहे.

अर्जाची पुष्टी (Application Confirm) झाल्यानंतर, विद्यार्थ्याला माहिती बदलता येणार नाही.

गुणवत्ता यादी (Merit List):

कागदपत्र पडताळणी नंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होते. तात्पुरत्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार आपण संभाव्य महाविद्यालय आणि शाखा ठरवू शकतो.

विकल्प नमुना (Option Form Filling):

कॅप  पोर्टलवर विकल्प नमुना (ऑप्शन फॉर्म) ऑनलाइन भरावा लागतो. ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्याने कॉलेज तसेच शाखेचा पर्याय द्यावा लागतो. विद्यार्थी त्यांच्या पसंतीचे किमान १ आणि जास्तीत जास्त ३०० पर्याय भरू शकतात. संस्था आणि अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने द्यावेत.

विद्यार्थ्याने पर्याय (Option) भरताना योग्य ती काळजी घ्यावी. एकदा कन्फर्म केलेला विकल्प नमुना (Option Form) बदलता येत नाही.

जागा वाटप (Seat Allotment):

गुणवत्ता क्रमांक आणि निवडलेल्या पर्यायांनुसार विद्यार्थ्यांना जागा (Seat) दिली जाते. जागा वाटप (Seat Allotment) झाल्या नंतर विद्यार्थ्याला ती जागा स्वीकृत (Seat Accept) म्हणजेच फ्रीझ (Freeze) किंवा नॉट फ्रीझ (Not Freeze) करावी लागते. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे जागा वाटप करण्यात आली, तर असे वाटप आपोआप गोठवले (Auto Freeze) जाईल आणि विद्यार्थी अशा प्रकारे केलेले वाटप स्वीकारेल. स्वीकृतीनंतर असा विद्यार्थी त्यानंतरच्या कॅप फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही. त्यानंतर अशा विद्यार्थीनी वाटप केलेल्या संस्थेत रिपोर्टिंग करावे आणि वाटप केलेल्या जागेवर प्रवेश घ्यावा.

रिपोर्टिंग आणि फी भरणे (Reporting and Fees Payment):

ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याने दिलेल्या पहिल्या पसंतीशिवाय इतर जागा देण्यात आल्या आहेत आणि जर उमेदवार अशा जागावाटपाने समाधानी असेल आणि पुढील कॅप फेऱ्यांमध्ये भाग घेऊ इच्छित नसेल, तर असा विद्यार्थी विद्यार्थीच्या लॉगिनद्वारे ऑफर केलेली जागा गोठवू शकतो. त्यानंतर अशा विद्यार्थीनी वाटप केलेल्या संस्थेत रिपोर्टिंग करावे आणि वाटप केलेल्या जागेवर प्रवेश घ्यावा.

विद्यार्थ्याने सीट फ्रीझ केल्या नंतर ऑलोटेड कॉलेजमध्ये जाऊन मूळ कागदपत्र जमा करून रिपोर्टिंग करावे लागते. महाविद्यालयामध्ये रिपोर्टींग करतांना विद्यार्थ्याला त्या कॉलेजची प्रवेश फी भरून प्रवेश निश्चित करावा लागतो.

२०२५-२६ मध्ये कॅपचे मुख्य ४ राऊंड आणि १ संस्थात्मक कोटा (Institute Level / Management) राऊंड आहे. वेळोवेळी CET CELL च्या वेबसाइटवर अपडेट तपासत राहा.

६. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रकार (Type of College)

महाराष्ट्रात विविध प्रकारची अभियांत्रिकी महाविद्यालये उपलब्ध आहेत. महाविद्यालयाचे विविध प्रकार खाली दिले आहेत:

  • सरकारी स्वायत्त महाविद्यालय (Government Autonomous College)
  • सरकारी महाविद्यालय (Government College)
  • अनुदानित खाजगी महाविद्यालय (Aided Private College)
  • स्वायत्त खाजगी महाविद्यालय (Autonomous Private College)
  • विना-अनुदानित खाजगी महाविद्यालय (Unaided Private College)

विद्यार्थ्याने महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम सावधगिरीने व माहितीच्या आधारावर निवडावा.

७. प्रमुख शाखा (Top Engineering Branches)

  • यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering)
  • स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering)
  • संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering)
  • माहिती तंत्रज्ञान (Information Technology)
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान (Artificial Intelligence and Data Science)
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (Artificial Intelligence and Machine Learning)
  • विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering)
  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी (Automobile Engineering)
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (Electronics and Telecommunication)
  • उत्पादन अभियांत्रिकी (Production Engineering)

निष्कर्ष

महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर अवलंबून आहे. MHT-CET आणि JEE (Main) ह्या महत्वाच्या परीक्षा असून, त्यांचा योग्य अभ्यास केल्यास उत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थी आणि पालकांनी या प्रक्रियेची संपूर्ण व योग्य माहिती घेतल्यास प्रवेशाच्या वेळी कोणताही गोंधळ न होता यशस्वीपणे प्रवेश घेता येईल. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे शाखा आणि महाविद्यालयाची योग्य निवड.

रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Registration process for Engineering CAP 2025| अभियांत्रिकी कॅप साठी नोंदणी प्रक्रिया

14 thoughts on “Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया”

Leave a Comment

Index