Seat Acceptance for Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशासाठी जागा स्वीकृती

कॅप फेरी-१ (CAP Round-1) मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे त्यांना जागा स्वीकृती (Seat Acceptance) करावी लागेल. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे ३१/०७/२०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता.

यंदा अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी तब्बल २ लाख १६ हजार विद्याथ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी प्रथम फेरीसाठी २६ जुलै २०२५ ते २८ जुलै २०२५ पर्यंत जवळपास १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना कॅप फेरी-१ मध्ये जागा वाटप झाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये १५ हजार ८५२ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांचा अर्ज ‘ऑटोफ्रिज’ (auto freeze) झाला आहे.

हा ब्लॉग तुम्हाला सीट स्वीकृतीच्या (Seat Acceptance) प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करेल. तसेच  प्रवेश प्रक्रियेतील पुढील पायऱ्या काय आहेत याबद्दल मार्गदर्शन करेल.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना (Important Instructions to candidate):-

  • पहिल्यांदाच जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवाराने दिनांक ०१/०८/२०२५ ते ०४/०८/२०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्व-पडताळणी आणि जागा स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करावी आणि दिनांक ०१/०८/२०२५ ते ०४/०८/२०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेला भेट द्यावी.
  • उमेदवारांनी त्याच्या/ तिच्या लॉगिनमधून पात्रता गुण, प्रवर्ग, लिंग, आरक्षण, स्वत: हून केलेले स्वत: चे विशेष आरक्षण यासंबंधीचे त्याने/तिने केलेले दावे बरोबर आहेत याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्याने/तिने दाखल केलेले दावे योग्य व बरोबर असल्याबाबतचे सुसंगत कागदपत्रे अपलोड केलेले आहेत याची खात्री करावी.
  • ज्या राखीव प्रवर्गातील (Reserved Category) (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, SEBC आणि EWS) विद्यार्थ्यांनी नोंदणी, ई-पडताळणी किंवा भौतिक कागदपत्र पडताळणी आणि पुष्टीकरण कालावधी दरम्यान जात/जमाती वैधता प्रमाणपत्र (Caste/Tribe Validity Certificate), नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate), ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS Certificate) पावती सादर केली होती, त्यांनी मूळ जात/जमाती वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र भौतिक तपासणी केंद्र किंवा ई-पडताळणी केंद्रावर अपलोड आणि पडताळणी करावी आणि चौथ्या फेरीच्या अहवालाच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी प्रवेशित संस्थेत मूळ प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा या उमेदवारांचा प्रवेश आपोआप रद्द होईल आणि खुल्या प्रवर्गासाठी उमेदवार पूर्ण भरलेल्या पात्रता निकषांनुसार पुढील संस्थास्तरीय फेरीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणला जाईल.
  • वाटप केलेल्या जागेची पुष्टी करण्यासाठी संस्थेला रिपोर्ट करताना, उमेदवाराने अर्जात केलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ सर्व मूळ कागदपत्रे सादर करावीत. जर उमेदवार दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाला, तर संस्था “स्वतःची पडताळणी आणि जागा स्वीकृती” रीसेट करेल आणि त्यानंतर उमेदवार पुन्हा त्याची स्वतःची पडताळणी करेल आणि माहिती दुरुस्त करण्यासाठी mark discrepancy  करेल.
  • उमेदवाराने पडताळणीसाठी मूळ प्रती संस्थेला सादर कराव्यात.
  • विध्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन पद्धतीने रु. १०००/- (फक्त एक हजार रुपये) जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. जागा स्वीकृती शुल्क हे नॉन-रिफंडेबल असेल.

जागा स्वीकृती (seat acceptance) करण्यासाठी:

जागा स्वीकृती (seat acceptance) करण्यासाठी चे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

  • निव रजिस्ट्रेशन / आल्रेडी रजिस्टर (New registration / Already Register) ह्या लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल
  • ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात साइन इन (Sign In) करा.
  • Centralised Admission Process (CAP) Registration” या बटन वर क्लिक करा.
  • नंतर “Bachelor of Engineering” या बटन वर क्लिक करा.
  • लॉगिनमध्ये “Seat Acceptance Menu” दाखवेल, त्यामध्ये “check your Allotment / Seat Acceptance Status” वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर तुम्हाला ऑलॉट झालेल्या जागेची माहिती दिसेल
  • नंतर “Proceed to Seat Acceptance” या बटन वर क्लिक करा.
  • स्व-पडताळणीची प्रक्रिया करा, नंतर “Save & Proceed” या बटन वर क्लिक करा.
  • सेल्फ कन्फर्मशन तिथे “मी माहिती पुस्तिका वाचली आहे आणि नियम क्रमांक ९ मध्ये दिलेल्या सूचनांनुसार, मला देण्यात आलेले जागा वाटप नियम आणि विनियमांनुसार आहे याची मी पडताळणी केली आहे. मी हे देखील सुनिश्चित करतो की पात्रता गुण, श्रेणी, लिंग, आरक्षण, विशेष आरक्षणाशी संबंधित अर्ज फॉर्ममध्ये मी केलेले दावे बरोबर आहेत आणि दाव्याची पुष्टी करण्यासाठी अपलोड केलेले संबंधित कागदपत्रे माझ्या माहितीनुसार आणि श्रद्धेनुसार प्रामाणिक आणि बरोबर आहेत. मला हे देखील माहित आहे की, नंतरच्या टप्प्यात, जर असे आढळून आले की मी चुकीची माहिती दिली आहे आणि/किंवा खोटी प्रमाणपत्रे सादर केली आहेत आणि अर्ज फॉर्ममध्ये केलेल्या खोट्या दाव्यांवर मला वाटप केलेली जागा आहे, तर वाटप केलेल्या संस्थेत घेतलेले असे वाटप/प्रवेश आपोआप रद्द केले जाईल आणि मी भरलेले शुल्क जप्त केले जाईल. पुढे कायद्याच्या तरतुदीनुसार मी कायदेशीर आणि/किंवा दंडात्मक कारवाईला पात्र राहीन.” समोर टिक करा
  • नंतर “Save & Proceed” या बटन वर क्लिक करा
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर तुमची सीट स्वीकृती स्थिती निवडा (Choose Your Seat Acceptance Status)
    • Betterment (Not Freeze) :
    • पुढील फेरीत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार:-
      • ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमांकाखेरीज इतर पसंतीक्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवार या वाटपाने संतुष्ट नसल्यास आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा असल्यास उमेदवार त्यांना झालेल्या जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्र. 9(3)(b)&(c) नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशीलांची अचूकता सुनिश्चित करून त्यास देऊ केलेली जागेवर स्वतःचा हक्क ठेवु शकतो
      • ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमांकाखेरीज इतर पसंतीक्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवाराने स्वयःपडताळणी व जागा स्विकृती न केल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल व उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये पात्र असेल.
      • वाटप करण्यात आलेल्या जागेवर, ऑनलाइन पद्धतीने जागा स्वीकृती करण्याची अंतिम दिनांक 0४/08/2025 Up to 3 P.M. आहे.
    • Freeze :
    • उमेदवाराने दिलेले परंतु स्वतःहून गोठवलेले पहिले पसंती व्यतिरिक्त:-
      • ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीक्रमांकाखेरीज इतर पसंतीक्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवार या वाटपाने संतुष्ट असल्यास आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसल्यास उमेदवार त्यांना झालेल्या जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्र. 9(3)(b)&(c) नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशीलांची अचूकता सुनिश्चित करून त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवू शकतो.
      • ज्या उमेदवाराने त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठविली असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होतील. असे उमेदवार वाटप झालेल्या संस्थेमध्ये विहित वेळेमध्ये प्रवेशासाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील.
      • अशा उमेदवारांकरिता करण्यात आलेले हे जागावाटप अंतिम असेल 
      • वाटप करण्यात आलेल्या जागेवर, ऑनलाइन पद्धतीने जागा स्वीकृती करण्याची अंतिम दिनांक 04/08/2025 Up to 3 P.M. आहे.
      • वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख 04/08/2025 Up to 5 P.M. आहे.
  • नंतर “Save & Proceed” या बटन वर क्लिक करा
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर तुमची सीट स्वीकृती स्थिती निवडण्यासाठी OTP येईल तो टाका आणी confirm बटन वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर Pay Seat Acceptance Fee करण्यासाठी ऑपशन येईल. 
  • फी जमा करा, स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्या पेजवर जागा स्वीकृती फॉर्म प्रिंट चे ऑप्शन दिसेल
  • फॉर्मची पीडीएफ डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ती जतन करा.

निष्कर्ष

अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-१ ची जागा वाटप यादी २०२५ ची घोषणा ही महाराष्ट्रातील हजारो इच्छुकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमची जागा वाटपाची स्थिती काळजीपूर्वक तपासणे, दिलेल्या मुदतीत जागा स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करणे आणि पडताळणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ही तुमच्या अभियांत्रिकी प्रवासाची फक्त सुरुवात आहे – स्पष्टता आणि आत्मविश्वासाने संपर्क साधा. कोणत्याही शंका किंवा पुढील मार्गदर्शनासाठी, अधिकृत अद्यतने आणि विश्वसनीय प्रवेश संसाधनांशी संपर्कात रहा. यशस्वी प्रवेशासाठी आणि पुढील उज्ज्वल अभियांत्रिकी कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!हा ब्लॉग उपयुक्त वाटला असेल, तर इतर मित्रांना नक्की शेअर करा. तुमचे प्रश्न खाली कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका.
तुमच्या अभियांत्रिकी प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठीची अलॉटमेंट यादीची सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Engineering Admission CAP Round-1 Allotment List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-१ साठी अलॉटमेंट यादी

अभियांत्रिकी प्रवेशासाठी तुमचा पर्याय फॉर्म योग्यरित्या कसा भरायचा याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी खालील ब्लॉग पाहा Option Form filling for CAP Round-1 of Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठी पर्यायी फॉर्म भरणे

Leave a Comment

Index